शेवगाव: प्रतिनिधी -विकास शेलार शेवगांव शहरातील एका हायस्कूल मध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुली नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेत जातो म्हणुन गेल्या त्या संध्याकाळ पर्यंत न आल्याने शेवगांव पोलीस स्टेशन ला मुली हरवल्याची मिसिंग ची कंप्लेंट नोंदवली सादर च्या गुन्हयाच्या तपासकामी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके याना माहिती दिली असता यां प्रकरणाचा तातडीने तपास करून मुली शोधण्याचे आदेश दिले असल्याने शेवगांव पोलीस स्टेशन चे पो. निरीक्षक विलास पुजारी यांनी सहाय्य्क पोलीस निरीक्षक रमेश बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तपासाचेB आदेश दिल्याने अहमदनगर येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी तपास केला असता सदर मुली मिळुन आल्या त्यांनी दिलेल्या माहिती नुसार 1) गु.रं.न. 151/2023 2) गु.रं.न. 152 /2023 भा. द. वि. कलम 363, 376 ( ¡ ) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होतें त्या नंतर आरोपींचा शोध घेऊन दिनांक 17 फेब्रुवारी रोजी आरोपी 1) विजय श्रीमंत सानप वय- 22 वर्षे राहणार मोराला तालुका आष्टी जिल्हा बीड 2) बाजीराव प्रभु कदरे वय- 22 वर्षे राहणार नगतला तालुका आष्टी जिल्हा बीड यां दोन्ही आरोपींचा गुप्त बातमीदाराच्या माहिती वरून अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके याना माहिती दिली असता यां प्रकरणाचा तातडीने तपास करून मुली शोधण्याचे आदेश दिले असल्याने शेवगांव पोलीस स्टेशन चे पो. निरीक्षक विलास पुजारी यांनी सहाय्य्क पोलीस निरीक्षक रमेश बागुल व त्यांच्या सहकारी पो ना धनाजी कालोखे पो. का. वासुदेव डमाले पो. का. परशुराम नाकाडे महिला पोलीस कॉन्स्टेबल शिरसाठ गीतांजली पाठरकर सदरची कामगिरी केली आहे
*ताजा कलम*
शेवगांव शहरातुन गेल्या काही दिवसांपासुन डझनभर अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत


