जयपूर : वृत्तसंस्था
अनेक भक्त नेहमी मंदिरात जावून आपल्यासाठी काही तरी देवाला मागत असतात पण एका भक्ताने तर अजबच प्रकार केला चक्क मंदिरात जावून देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्याच मंदिरात चोरी केल्याची घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये मंदिरात समोर आली आहे.
एका चोरी आधी भाविक म्हणून देव नारायण मंदिरात आला आणि देवाला नमस्कार करून मग चोरी करतो. मंदिरात चोरी करून तो लगेच तिथून गायब झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. गोनाकासर गावातील देव नारायण मंदिरातील ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या चोराने आधी भगवान देव नारायणाचं हात जोडून दर्शन घेतलं. त्यानंतर तिथे असलेली 3 किलो चांदीची छत्री उचलून पळाला. यात एका महिलेने त्याला साथ दिली. ती बाहेर लक्ष ठेवून होती. चोरी करण्यात आलेल्या छत्रीची किंमत अंदाजे 2 लाख रूपये असल्याचं सांगण्यात आलं.
ही घटना मंदिरात दुपारी साधारण दीड वाजता घडली. चोर मंदिरातील 5 छत्र आणि 2 माळा चोरी करून घेऊन गेले. पुजारी श्योपाल गुर्जरने सांगितलं की, बुधवारी सकाळी जेव्हा त्याने पूजा केली तेव्हा छत्र होतं. पण सायंकाळी 7 वाजता पुन्हा पूजा करण्यासाठी गेल्यावर तेव्हा छत्राकडे त्याचं लक्ष नव्हतं. गुरूवारी सकाळी 5 वाजता पूजा करण्यासाठी गेला तेव्हा त्यांना छत्र तिथे नसल्याचं समजलं. यानंतर त्यानी सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज चेक केलं तेव्हा दुपारी दीड वाजता चोरी आत घुसल्याचं आणि चोरी केल्याचं त्यात दिसलं.
गावातील लोकांनी सांगितलं की, याच मंदिरात सहा महिन्याआधीही 5 छत्रांची चोरी झाली होती आणि 2 महिन्यांआधीही चोरांनी मंदिरात चोरी केली होती. तिनदा चोरी झाल्याने गावातील लोकांमध्ये संताप आहे. चोरी झाल्यानंतर दरवेळी गावातील लोक छत्र दान करत होते. चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. मनोहरपूर भागात साधारण 200 मंदिरं आहेत. ज्यांची सुरक्षा करण्यासाठी कुणीही तैनात नाही. त्यामुळे लोक चौकशी मागणी करत आहेत. पोलीस चोरांचा शोध घेत आहे.