पारोळा : प्रतिनिधी
शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभा सुरु असतांना याठीकाणी चोरट्यांनी आलेल्या शेतकरीच्या हातावर तुरी देत हजारो रुपये चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एका शेतकरी खिश्यातून हजारो रुपये लंपास झाल्याची घटना घडल्यानंतर पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असल्याने पारोळा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारोळा तालुक्यासह शहरातील अनेक नागरिक या सभेत उपस्थित झाले होते. यावेळी तुफान गर्दी पाहून चोरट्यांनी आलेल्या लोकांचे खिश्यातून चांगलीच लुट केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालक्यातील देवगाव येथील रहिवासी सुनील युवराज पाटील (वय ३६) हे दि १६ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेच्या ठिकाणी गेले असता त्यांच्या खिश्यातून चोरट्याने तब्बल ३० हजार रुपये चोरून नेल्याची घटना ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील तपास पोहेकॉ.नाना पवार हे करीत आहेत.