अमळनेर: तालुक्यातील शिरूड येथे इंधवा मार्गे येणारी बस शिरुड गावावरून अमळनेरच्या दिशेने जात असते ही बस शिरूड गावात आल्यावर ही नेहमीच अगोदर प्रवाशांनी गच्च भरलेली असते तर अनेक वेळ भरून आलेली बस शिरूड थांब्यावर न थांबत सुसाट निघून जाते त्यामुळे विद्यार्थी शाळेत, कॉलेजला वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर काही वेळा बस थांबल्यास त्या बस मध्ये अगोदर पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते बस मध्ये बसण्यासाठी जागा मिळण्याचे तर दूरच पण दाटा- दाटीने उभे राहायला सुद्धा जागा मिळत नसते अनेक विद्यार्थ्यांना खालीच राहावे लागते. अनेक वेळा बसची वाट पाहत बस थांब्यांवर आल्यानंतर अशी अवस्था असल्यामुळे नाईलाजाने शाळेत, कॉलेजमध्ये वेळेवर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तर विद्यार्थ्यांची काढलेली मासिक पास काय कामाची याबाबत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तरी एसटीच्या प्रवासाबाबत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर येऊन ठेपल्या आहेत तर परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कसा प्रवास करावा असा प्रश्न निर्माण होत आहे