अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील राहणाऱ्या महिलेच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करीत ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती कि, शहरातील विद्या नगरातील प्लॉट न.५० परिसरातील रहिवासी ग.भा.उषा सुभाष सोनार (वय ६१) यांच्या घराचा दि २६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान अनोळखी चोरट्यांनी कडी कोयडा तोडून घरात प्रवेश करीत घरातील ३९ हजार रुपये किमतीचे सोन्याची लक्ष्मी, ६ हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, २० हजार रुपयांची रोकड लंपास केल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कैलास पवार हे करीत आहेत.