जळगाव: संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ आणि निधन ४ डिसेंबर १८०६ मध्ये झाला. हे बंजारा समाजाचे संत म्हणून ओळखले जायचे. नाईक कुळातील या भीमा नाईक यांचे ते चिरंजीव होते
संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहेत.तर त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला.
आज श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त जळगाव महापालिकेत माल्यार्पण करण्यात आले यावेळी महापौर सौ.जयश्री महाजन समवेत आयुक्त डॉ विद्या गायकवाड नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णूभाऊ भंगाळे , सुनील खडके नगरसेविका सीमा भोळे, लता भोईटे, रेखा पाटील ,अंजना सोनवणे ,सरिता नेरकर, सुचित्रा हाडा आयुक्त उपायुक्त गणेश चाटे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगीरे व इतर मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.