चोपडा प्रतिनिधी :- शहरातील नगरपरिषदेमागील स्टेडियमलगत असलेल्या कुंटणखान्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ३६ तरुणींची सुटका केली असून यात ०९ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ०७ महिलांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीसांनी छापा टाकून तब्बल ३६ तरूणींची सुटका करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ०९ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे यांच्यासह त्यांच्या पथकाने शुक्रवार ०३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या पत्र्यांच्या शेडवर छापा टाकला.
यात जिल्ह्यासह परराज्यातील तब्बल ३६ तरूणी आढळून आल्यात. सर्व तरूणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणात कुंटनखाना चालविणाऱ्या ०९ महिलांवर पोहेकॉ. दिपक भावलाल विसावे यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलीस स्टेशनला सी.सी. टी. एन. एस. गुरनं. 44/2023 स्त्रिया व मुलींचे अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 6 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. या कुंटणखान्यात मध्यप्रदेश, मणिपूर, पश्चिम बंगाल, राजस्थान कलकत्तासह नेपाळमधील तरूणींना आणले जात असून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतल्या जात आहे. वारंवार कारवाया होऊन सुद्धा या परिसरात देह व्यापार केला जात होता.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली चोपडा शहर पो.स्टे. प्रभारी सपोनि. अजित सावळे, संतोष चव्हाण, पोउनि. घनश्याम तांबे, पोहेकाँ. दिपक विसावे, प्रदिप राजपूत, पोना. विलेश सोनवणे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदिप भोई, जितेंद्र चव्हाण, महेंद्र साळुंखे, रवि पाटील, पोकाँ. विजय बच्छाव, सुमेरसिंग वाघेर, शुभम पाटील आदिंसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.


