जळगाव महानगरपालिका आयुक्तपदाचा मॅट’ने देत डॉ. विद्या गायकवाड यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.
जळगाव महापालिका( commissioner Dr Vidya Gaikwad)आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना तडकाफडकी कार्यमुक्त केल्याचे आदेश २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानकपणे आले. त्यांच्या जागी परभणी येथील आयुक्त देविदास पवार (Devdas Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासकीय आदेशानुसार त्यांनी तत्काळ जळगाव येथे येत पदभार स्वीकारला होता.
आदेश झाल्यावेळी डॉ. विद्या गायकवाड (Dr Vidya Gaikwad)या पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. हा एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप डॉ. विद्या गायकवाड यांनी करत मॅट’ने मध्ये तक्रार केली होती. ‘मॅट’ने डॉ. गायकवाड (Dr Vidya Gaikwad) यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. मात्र, निकाल लागेपर्यंत देविदास पवार हेच आयुक्तपदी (commissioner)राहतील, असे आदेश दिले होते.
दरम्यान, डॉ. गायकवाड यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले देविदास पवार( Devdas Pawar)यांची दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेश दिले असल्याचे माहिती समोर येत आहे.