अमळनेर( पोलीस वृत्त ऑनलाईन) शहरातील एका परिसरातील ३० वर्षीय विवाहितेचा सासरचे मंडळीकडून छळ केल्या प्रकरणी पतीसह ४ जणांविरोधात अमळनेर पोस्ट ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि, अमळनेर शहरातील गुरुकृपा कॉलनीतील माहेर असलेले प्रियंका संदीप पाटील(Priyanka Sandip Patil) या महिलेचा विवाह बडवानी जिल्ह्यातील पानसेमल येथील बडगुन येथील संदीप केशव पाटील यांच्यासोबत झालेला आहे. विवाहितेस दि १० डिसेंबर २०१३ पासून सासरचे मंडळींनी लग्नामध्ये हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून व माहेर हून एक लाख रुपये आणावे या नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत घराबाहेर काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून ३० वर्षीय विवाहितेने (Amalner)अमळनेर पोलीस स्थानकात पती संदीप केशव पाटील(Sandip keshav Patil) यांच्यासह ४ जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.


