स्टाफ सिलेक्शन कमिशन पदांसाठी परीक्षा प्रथमच मराठीसह तेरा प्रादेशिक भाषांतून घेण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे – असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे
पहा काय म्हणाले जितेंद्र सिंह
स्टाफ सिलेक्शन कमिशन पदांसाठी परीक्षा आता प्रादेशिक भाषेत घ्यावी अशी मागणी दक्षिण भारतातून करण्यात आली होती, त्याचा विचार करून केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण खात्याने हा निर्णय घेतला.
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातील, राज्यघटनेच्या आठव्या अधिसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २२ भाषांमध्ये आगामी काळात परीक्षा घेण्यात यावी, अशी शिफारस अभ्यासासाठी नेमलेल्या समितीने केली होती