जळगाव: बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य आजारांच्या निदाना करीता बालरुग्ण मोफत आरोग्य तपासणी शिबीर चे
उद्घाटन श्री ठाकूरदास पुजारी यांच्या हस्ते श्री गणेश पूजेने रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 9:30 ते 2:30 वजे पर्यंत संत भोजाराम मंदिर (डहरकी दरबार)
चेतनदास मेहता हॉस्पिटल समोर, सिंधी कॉलनी , कंवर नगर येथे करण्यात आले. …
प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध डॉ. गौरव महाजन, डॉ प्राची गौरव महाजन आणि डॉ फैसल शेख (बाल रोग तज्ञ) यांच्या विशेष सहकार्याने मोफत तपासणी करण्यात आल्या
सर्व धर्म आणि समजाच्या गरजू लोकांनी शिबीराचे लाभ घेतले व त्यात लहान मुले ४० आणि ५५ मुलींच्या *एकुण ९५ बालकांची तपासणीकरण्यात आली*, त्यात सर्दी खोकला ताप, जॉइंडीस, पोट दुखणे, वजन कमी, झोप कमी दमा आणि सांधेदुखी आजारांचे प्रमाण आढळून आले, वय प्रमाणे १ महिन्या ते १० वर्षा पर्यंतच्या बाळांचे तपासणीत उपस्थिती जास्त होती,
शिरसोली गाव, रामेश्वर कॉलनी, तांबापुरा, जोशी नगर, सिंधी कॉलनी, गणपती नगर, विनोबा नगर, साई प्रसाद कॉलनी, मास्टर कॉलनी, गणेश नगर, महाबळ कॉलनी, रिंग रोड, जुनी जळगाव परिसरातील लोकांनी शिबीराचे लाभ घेतले.
ह्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संत भोजाराम मंदिराचे पुजारी श्री ठाकूरदास जी, झुलेलाल इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्य अध्यापक श्री. ए. व्ही. मोतीरामानी, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या उप मुख्य अध्यापिका सौ सपना रावलानी, समाज सेवक श्री अमर बालानी, समाज सेविका सौ रजनी बालाणी आदि मान्यवर उपस्थित होते
या शिबिरसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव तालुका अध्यक्ष महेश चावला , गिरधर दाभी, राजेन्द्र गांगुर्डे , सौ मनीषा पाटील, सौ अंतिम पाटणी, गायत्री देवरे, हास्य कला ग्रुपचे अध्यक्ष रघुनाथ कोल्हटकर , गणेश कोकाटे, विलास पाटील, प्रमोद नेवे, नाना सपकाळे आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव तालुका सर्व सदस्य सहभागी झाले.
प्रमुख अतिथीयांचे सत्कार डॉ नितिन दांडे आणि रघुनाथ कोल्हटकर यांनी केले
डॉ अविनाश सोंगिरकर, नवीन चावला, गुरूबक्ष जाधवांनी, विकास पाटील यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव तालुका महेश चावला अध्यक्ष यांनी आभार व्यक्त केले.