मुक्ताईनगर प्रतिनिधी : कैलास कोळी
–कु-हा काकोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे या कामांमध्ये ठेकेदाराकडून निकृष्ट प्रतीच्या दर्जाचे बांधकाम साहित्यवापरण्यात येत आहे
सदरचे काम हे जिल्हा परिषद अंतर्गत विशेष दुरुस्ती संदर्भात मंजूर असून हे काम ठेकेदाराच्या मनमानी प्रमाणे सुरू आहे ,ठेकेदार हा कोणालाही जुमानत नाही हुकूमशाही पद्धतीने यांची ठेकेदारी चालू आहे
या कामावरती स्थानिक पदाधिकारी गेल्यावरही व सामाजिक कार्यकर्ते कामावरती गेल्यावरही कामाच्या संदर्भात फोनवर बोलल्यावरही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही
अशा भष्टाचार ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून बोगस केलेल्या कामाच्या चौकशी करून संबंधित ठेकेदाराचं परवाना काळ्या यादीतमध्ये टाकण्यात यावे, अशा प्रकारची मागणी कु-हा परिसरातील राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांची मागणी पुढे येत असून जि, प बांधकाम विभागाने चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे जेणेकरून शासनाच्या निधीचा कामामध्ये भ्रष्टाचार होणार नाही व चांगल्या दर्जाचे काम केल्या जातील ,या कामात वापरण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे जुने असून कुठून तरी काढून आणले आहे,मुक्ताई नगर मतदार संघात बरीच कामे सुरू आहेत परंतु ठेकेदार भाऊ नावाचा उपयोग करून निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे, काही ठेकेदार दोन्ही भाऊचा उपयोग करून आपली पोळी भाजून मलिदा खात आहे,यामुळे विकास कामाचा दर्जा घसरला आहे,शासनाचे लाखों रुपये वाया जात आहे,भाऊ भाऊ खाऊ खाऊ चे वादळ निर्माण झाले असून सामन्य जनता तक्रार केली तर त्यांना धाक दाखवून आपले खिसे भरीत आहे,याला कोण जबाबदार?असा प्रश्न उपस्थित होत आहे