पोलीस वृत्त- ऑनलाईन गेल्या अनेक दिवसांपासून देशात चांगलीच थंडी वाढली असून, अशात आता देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये देखील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पहा काय सांगितले हवामान खात्याने
21 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून, 22 जानेवारीनंतर हवामानात बदल होईल दरम्यान सध्या सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 23 ते 25 जानेवारी दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून रिमझिम पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.


