प्रतिनिधी: रवि कोळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कौंटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्री रीतेश लिमकर साहेब हे होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेविका सौ.भारती कुमावत यानी केले सदर कार्यक्रमास न्यायालय प्रबंधक श्री रविन्द्र ठाकुर ,विवाह समुपदेशक श्री सचिन मोरे , तसेच विधिज्ञ , न्यायालयीन कर्मचारी वृंद व पक्षकार हे उपस्थीत होते कार्यक्रमाचे वक्ते श्री जगदिश बियाणी सर यांनी मराठी भाषेचा उगम कधीपासून झाला त्या बाबत ची सविस्तर माहिती व न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचे महत्व समजुन सांगितले मराठीचे खोलवर ज्ञान सरांनी अगदी सोप्या भाषेत कथन केले तसेच लिमकर साहेबांनी मराठीत जजमेंन्ट देण्याचे फायदे समजुन सांगितले व न्यायालयीन कामकाजात माराठी भाषेचा वापर हा सर्वसाधारण लोकांना कसा फायद्याचा असतो या बाबत विस्तृत माहिती दिली , अशा पध्दतीने कार्यक्रमाची सांगता करतांना आभार न्यायालयाचे वरीष्ठ लिपीक श्री नारायण पाटील यांनी मानले.


