जळगाव-(पोलीस वृत्त ऑनलाईन)शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका बंद कंपनीत गुरुवारी सकाळी ६६ वर्षीय वृद्धाचा मृतदेह जळताना आढळून आला. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले असून घातपात की अपघात असा तपास सुरू आहे.
एमआयडीसी हद्दीत असलेल्या(ram nagar) राम नगरात ईश्वर देवराम अहिरे(ishwar devram ahire) वय-६६ हे परिवारासह राहतात. ते सुरक्षारक्षक (security)म्हणून काम करून उदरनिर्वाह भागवतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या( vikram plastic)विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे(kashinath marathe) यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता एक इसम जळत असल्याचे समजले. मराठे यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळविले.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत,(sandip gavit) एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे( jaypal hire)हे पथकासह पोहचले आहेत. एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर वय-३० यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर अहिरे यांच्या पत्नीचा देखील जळून मृत्यु झाला होता तसेच काही दिवसापूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाने देखील आत्महत्या केली. अहिरे यांना दारूचे व्यसन होते तसेच तीन दिवसापूर्वी त्यांचा पगार झाला तेव्हापासून ते कामावर नव्हते. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाने तपास सुरू आहे.


