जळगाव: (पोलीस वृत्त ऑनलाईन)दि. 19 रोजी सकाळी 07:25 वा पूर्वी रेल्वे स्टेशन जळगाव येथे खंबा नंबर 420 / 29 ते 420 / 31 चे मध्ये डाऊन मेन रेल्वे लाईन जवळ कोणत्यातरी धावता रेल्वेगाडीतून पडून जबर जखमी होऊन जागीच मरण पावला आहे तरी सदर मयत यांची ओळख पटली नसून व त्यांचे प्रेत ओळख पटवणे कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राखून ठेवले आहे करिता नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे पोलीस जळगाव यांचे मार्फतीने करण्यात येत आहे. मृत व्यक्तीचे वर्णन केस काळे, रंगा गोरा, शरीर बांधा सडपातळ, उंची 05 बाय 5, अंगात कळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व डॉलर कंपनीची निळ्या रंगाची अंडरवेअर मयत पुरुष वय 27 वर्ष हे पुढील तपास हे.कॉ सचिन भावसार करीत आहे


