रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. रायगडच्या माणगावनजीक अपघात. ९ जण जागीच ठार, पहाटे पाच वाजता अपघात, मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत.
-गोवा (gova) महामार्गावर माणगाव (mangav)नजीक गुरुवारी पहाटे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, माणगावच्या रेपोली गावाजवळ असलेल्या मुंबई-गोवा (mumbai -gova) महामार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


