शेवगाव प्रतिनिधी: विकास शेलार दि. 16 शेवगाव पोलीसांची अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई सहा लाखाचा मुददेमाल हस्त़गत अवैध वाळु वाहतुक करणा-या ट्रॅक्ट़रवर शेवगाव पोलीसांनी कारवाई करत ट्रॅक्ट़रसह 6,00000/- चा मुददेमाल जप्त़ केला आहे. शेवगाव पेालीसांना आखेगाव शिवारात आखेगाव ते शेवगाव रस्त्यावर चोरुन वाळु वाहतुक चालु आहे.अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक श्री विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विश्वास पावरा, पो.हे.कॉ. परशुराम नाकाडे,पो.हे.कॉ. नेताजी मरकड,पो.कॉ. किशोर शिरसाठ, पो.कॉ. संपत खेडकर, पो.कॉ. बप्पासाहेब धाकतोडे, पो.कॉ. राहुल खेडकर यांचे पथक नियुक्त़ करुन बातमीतील नमुद ठिकाणी सापळा रचुन दिनांक 16/01/2023 रोजी सकाळी 11.00 वा.सुमारास एक वाळु वाहतुक करणारा स्व़राज कंपनीचा निळया रंगाचा विना नंबरचा ट्रॅक्ट़र दिसल्याने त्यास थांबवुन वाळु वाहतुकीचे परवान्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याचेकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे स्पष्ट़ झाले त्यानंतर चालक संतोष शरद दौंडे या गुन्ह्यातील आरोपी रा.सोमठाणा ता.पाथर्डी त्याचे वय 17 वर्ष आहे. अल्पवयीन असल्यामुळे त्याला समज पत्रावर सोडून देण्यात आहे. त्याचे ताब्यातील सहा लाख रुपये किमतीचा एक स्व़राज कंपनीचा निळया रंगाचा विना नंबरचा ट्रॅक्ट़र व ट्रॅक्ट़र ट्रॅालीमध्ये असलेली 3000 /- रुपये किमतीची 1 ब्रॉस वाळु ट्रॅक्ट़रमध्ये मिळुन आल्याने संबधीत वाहन जप्त़ करुन शेवगाव पेालीस स्टेशन ला संबधीत चालका विरुध्द़ पो. कॉ. किशोर आबासाहेब शिरसाठ यांचे फिर्यादीवरुन वाळु चोरी व पर्यावरण संरक्षण कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप मिटके श्रीरामपूर विभाग चार्ज शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी,स.पो.नि. श्री विश्वास पावरा, पो.हे.कॉ. परशुराम नाकाडे,पो.हे.कॉ. नेताजी मरकड,पो.कॉ. किशोर शिरसाठ, पो.कॉ.संपत खेडकर, पो.कॉ/बप्पासाहेब धाकतोडे,पो.कॉ. राहुल खेडकर यांनी केली आहे.पोलीसांनी केलेल्या कारवाईचे नागरीकातुन स्वागत होत आहे.
ताजा कलम
गेल्या काही दिवसांपासुन पोलीस प्रशासन आणो शेवगांव महसुल विभागाने सतत कारवाई करून अनेक वाळु माफीयांच्या मुसक्या आवळल्याने यां धनदयातील लोकांचे पार कंबरडें मोडले आहे {भीक नको पण कुत्र आवर } “धंदा नको पण पोलीस आव”र म्हणन्याची पाळी आली आहे काही वर्षानुवर्षे अशी धडक कारवाई झाली नव्हती


