(जळगाव- पोलीस वृत्त ऑनलाईन) जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या संदर्भात रामानंदनगर पो.स्टे ला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव (jalgaon) तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा वास्तव्याला आहे. त्याला एका मोबाईल (mobail) क्रमांकवरील गुड्डू (guddu)नावाच्या अंदाजे २८ वर्षीय तरुणाने १२ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता जळगाव(jalgaon) शहरात बोलवून घेतले. यानंतर त्याने जळगाव शहरातील एका भागात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक (unnatutal)कृत्य केले आहे.
दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पीडित (the victim)मुलाने त्याचे नातेवाईकांसह रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार (camplant) दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून गुड्डू नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.


