मोबाईल धारकांसोबत होणाऱ्या सिमकार्ड फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता दूरसंचार विभागाने नवे नियम जारी केले आहेत
या नियमांनुसार नवीन सिम सक्रिय झाल्यानंतरसुद्धा पुढील 24 तास इनकमिंग-आउटगोइंग कॉल्स आणि एसएमएसची सुविधा बंद राहणार आहे.
मोबाईल सेवांचा वापर करण्यासाठी ग्राहक नवीन सिम कार्ड खरेदी करतात किंवा पोर्ट करतात. पण या दोन्ही परिस्थितीत आपल्याकडे नवीन सिम कार्ड येते. आता हे नवीन सिम कार्ड सध्या 3 ते 4 दिवसांत सुरू होते, असं म्हणतात.
मात्र आता ते त्यानंतरही पुढील 24 तास म्हणजेच आणखी एक दिवस बंद राहणार आहे, असा दूरसंचार विभागाने सांगितले आहे.
नवीन सिम किंवा अपग्रेडसाठी विनंती केली गेली आहे किंवा नाही याची सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहकांशी संपर्क करून पडताळणी केली जाईल.
ग्राहकाने नवीन सिमची विनंती नाकारल्यास, नवीन सिम सक्रिय केले जाणार नाही. आता दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना हा नियम लागू करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.


