जळगाव प्रतिनिधी- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव यांचे तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित आनंद यात्री अण्णासाहेब डॉ. जी.डी.बेंडाळे नवव्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत शहरातील डॉ. जी.डी. बेंडाळे कनिष्ठ महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे.
दिनांक 12 जानेवारी रोजी ही स्पर्धा पार पडली. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये “स्वयंअध्ययनाची सवय वाढीस लागत आहे/नाही”.हा स्पर्धेचा विषय होता त्या अनुषंगाने स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी आपापली मते व्यक्त केली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालयातील कु.सेजल पाटील व कु.प्रिया परिहार यांनी *सांघिक द्वितीय क्रमांकाचे* पारितोषिक मिळवले तर कुमारी सेजल पाटील हिने *वैयक्तिक प्रथम* क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.सौ.शितल चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली.या यशाबद्दल संस्थाचालक,प्राचार्य,उपप्राचार्य, समन्वयक व सर्व प्राध्यापकांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.


