पोलीस वृत्त- न्यूज नेटवर्क- सरकारने मोफत रेशन योजनेच्या नियमात मोठे बदल केला , रेशन कार्डवर मिळणाऱ्या तांदळाचा कोटा कमी करण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. ज्यामुळे राज्यातील जनतेला आता 1 किलो कमी तांदूळ मिळणार आहे.
पहा काय आहे कारण?
राज्य सरकारने तेलंगणात रेशनकार्ड बाळगणाऱ्या सुमारे 91.5 लाख कुटुंबांना मोफत तांदूळ वाटप सुरू केले असून, लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला यंदा मार्चपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिन्यांसाठी 5 किलो वजन देण्यात येणार आहे.तसेच रेशन कार्ड धारकांना तांदूळ मोफत वाटण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदळातील सॉफ्टवेअर अपडेटमुळे मे 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत 200 किलो ऐवजी 203 किलो तांदूळ देण्यात आला. 3 किलो अधिक तांदूळ दिले.
त्यामुळे राज्य सरकारने आता यावर्षी जानेवारी ते मार्च या पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा एक किलो कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, एप्रिलपासून रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांना प्रति व्यक्ती 6 किलो तांदूळ वाटप पुन्हा सुरू करण्यात येणार. याशिवाय राज्य सरकार स्वखर्चाने ९२ लाख लाभार्थ्यांना तांदूळ वाटप करत आहे.


