तुम्हाला माहिती असेल, मागच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडी वाढत आहे. दरम्यान आता राज्यातील जवळपास 19 जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कुठं पडणार थंडी ?
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरी येण्याचा अंदाज देण्यात आला आहे. तर पुणे, नगर जिल्ह्यांतील काही भागात देखील थंडीची लाट येण्याची शक्यता आहे – असे हवामान विभागाने म्हटले आहे


