• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टर ला राज्य शासनाचा पुरस्कार!

policevrutta by policevrutta
January 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टर ला राज्य शासनाचा पुरस्कार!
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई दि.10 प्रतिनिधी – जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार श्री. विजय जैन यांच्या प्लास्टिक प्रदूषण विषयाचे गांभीर्य अधोरेखित करत, घराबाहेर पडताना आपली कापडी पिशवी सोबत बाळगण्याची आठवण करून देणाऱ्या लक्षवेधी पोस्टर रचनेला महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६२ व्या वार्षिक प्रदर्शनात ५० ००० (रुपये पन्नास हजार) चे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्रा प्रमोद रामटेके, अमूर्त चित्रकार, नागपूर, श्री. राजीव मिश्रा, कला संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि १० जानेवारी २०२३ रोजी सायं ५.३० वा. प्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते जैन यांना गौरविण्यात आले. उपयोजित कलेच्या सदर पोस्टरसह विजय जैन यांच्या रेखा व रंगकला विभागात “रंगलीपी” ही जलरंग चित्र मालिका देखील या वार्षिक कला प्रदर्शनाचा भाग आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ११ ते १६ दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी प्लास्टिक कचऱ्यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयाला साध्या सोप्या रुपात मांडल्याचे सांगत श्री विजय जैन उपयोजित कलेबरोबर रेखा व रंगकलेमध्ये देखील आपले योगदान सातत्याने देत असल्याबद्दल यांचे कौतुक केले आहे. नुकताच “पुरुषी अहंकार” या विषयावरच्या त्यांच्या पोस्टरला मुंबईच्या “डूडल सोशल ॲड फेस्ट” या राष्ट्रीय स्पर्धत नामांकन मिळाले आहे. सदर स्पर्धेचे ते २०१७ चे विजेते आहेत. विजय जैन यांच्या “स्त्री शिक्षणा”च्या पोस्टर ला उत्तर प्रदेश ललित कला अकादमी चा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत, प्रौढ शिक्षण, झाडं वाचवा, बाल कामगार, सकस आहार- विद्यार्थी, सोशल मीडिया वापर: एक जबाबदारी आणि कोरोना काळातील मास्क वापरासाठी उद्युक्त करणारी सोशल मीडिया मालिका अशा सामाजिक विषयाला धरून त्यांनी अतिशय कल्पक आणि प्रबोधनात्मक पोस्टर रचना साकारल्या आहेत. त्यांच्या या कामाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

ब्रेकिंग ! – राज्यात पुढील 2 दिवस येणार थंडीची लाट, तर या भागात पडणार थंडी

Next Post

गुरांची वाहतुक करणारी बोलोरो पिकअप चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल…

policevrutta

policevrutta

Next Post
गुरांची वाहतुक करणारी बोलोरो पिकअप चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल…

गुरांची वाहतुक करणारी बोलोरो पिकअप चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!