महावितरण कंपनीने सरासरी २ रुपये ३५ पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य झाल्यास वीज ग्राहकांना लवकरच वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
पहा काय आहे कारण- तसेच गेल्या काही काळात खर्चात वाढ झाल्याने महानिर्मिती कंपनीने सरासरी प्रति युनिट १.०३, तर महापारेषण कंपनीने ३२ पैसे असा एकूण १.३५ रुपये प्रति युनिट दरवाढ केली आहे. अदानी कंपनीने विदेशी कोळसा आयात करून वीजपुरवठा केल्याने, महावितरण कंपनीने सरासरी प्रति युनिट २.३५ रुपये दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे.


