अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे शिवारात निम येथील विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. बाबत या प्रकरणी आता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की ४ ऑक्टोबर २०२२ रोजी कळमसरे निम रस्त्यावर सबस्टेशन जवळ असलेल्या विहिरीत निम येथील समाधान जहांगीर कोळी याची पत्नी जयश्री समाधान कोळी व मुलगी नंदिनी समाधान कोळी या मायलेकीचा मृतदेह आढळून आला होता. कळमसरे गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीत सुरूवातीला जयश्नीने मुलीला लोटले व नंतर स्वतः उडी मारून जीवनयात्रा संपविली होती. याप्रकरणी पती समाधान कोळी याने एकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. यात गावातील अशोक गटलू कोळी यास मृत विवाहितेने दिलेली ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बाही त्याने परत केली नाही. तसेच संबंध ठेवण्यास नकार दिल्याने फोटो व रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची वारंवार धमकी दिल्याने सदर विवाहितेने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. त्यावरून अशोक गटलू कोळी याच्याविरुद्ध मारवड पोलीसात भादवि कलम ३०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. उ. नि. बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.


