टेलिकाॅम कंपन्या लवकरच मोबाईल रिचार्जचे दर वाढवणार आहेत – त्यामुळे फक्त कॉलिंगच नाही, तर आता इंटरनेट रिचार्जही महागण्याची शक्यता आहे.
कशामुळे वाढणार किंमती – 5G सेवा चालवण्यासाठी कंपन्यांना दीड ते दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळेच टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवणार आहे.
किती रुपयांनी होणार वाढ -फिच रेटिंग्ज व जेएम फायनान्स यांच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या टॅरिफ प्लॅनमध्ये 15 ते 20 टक्के वाढ करू शकतात.
ही वाढ केवळ प्रीपेड पुरतीच नसून, पोस्टपेड प्लॅनच्या किमतीही वाढू शकतात. पोस्टपेड प्लॅनमध्ये 20 टक्क्यांची वाढ होऊ शकते. मात्र, ही दरवाढ एकाच वेळी न करता, 2 ते 3 हप्त्यांमध्ये केली जाणार असल्याचे जेएम फायनान्शिअलचे म्हणणे आहे.