शेवगाव प्रतिनिधी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत, निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव महाविद्यालय राष्ट्रीय योजना शिबिर व श्रमसंस्कार केंद्र दिनांक 29/ 12 /2022 ते 04/ 01/ 2023 या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भगूर या गावी कॅम्प सुरू आहे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दुकळे पी.ए. यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम अधिकारी निजवे एस. एम. विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी खोसे. ए.एच. व महिला प्रतिनिधी प्राध्यापिका असणे एस. एन. यांच्या समवेत तसेच सर्व प्राध्यापक रुंद व इतर कर्मचारी ,महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक यांनी गेली पाच दिवसापासून गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, स्मशानभूमी स्वच्छता ,गावातील रस्त्यावरती मुरूम भरणे व जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंड साठी रंगकाम करणे अशी विविध श्रमदान तसेच जनजागृतीची मोहीम हाती घेऊन एक नवा आदर्श निर्माण करण्याचे कार्य हे स्वयंसेवक करत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामधून विद्यार्थी निश्चित घडतो म्हणजेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण व विद्यार्थ्यांना समाजामध्ये जबाबदारीने राहण्याची सवय दृढ होते, तसेच श्रम प्रतिष्ठा, वक्तशीरपणा, सौजन्यशीलता, संवेदनशीलता असे विविध गुणांनी विद्यार्थी युक्त होतो. तरी या शिबिरासाठी भगूर गावांमधून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे व सरपंच मा. वैभवजी पुरणाळे यांनी देखील विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


