जळगाव प्रतिनिधी: जिल्हातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी शोध घेवून अटक करणे बाबत मा पोलीस अधिक्षक श्री एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक, श्री चंद्रकांत गवळी यांनी जळगांव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील स. फौ/अनिल जाधव, पो.हवा / कमलाकर बागुल, पो.हवा./अनिल देशमुख, पो.हवा / दिपक पाटील, पो.ना./संतोष मायकल, पो.ना./हेंमत पाटील व पो.कॉ उमेश गोसावी व चालक पो.हवा./राजेद्र पवार यांचे पथक रवाना केलेले होते.
पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील याना गोपनिय माहीती मिळाली की, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गु.र.न.- ४६९ / २०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४ या गुन्ह्यातील आरोपी नामे- १) प्रमोद कैलास धिवरेवय २७ रा. कंडारी, अशोक सम्राट नगर. ता. भुसावळ, २)मयुर संजय अभोरे वय २२ रा. १५ बंगला भुसावळ, ३) आकाश किशोर किरतकुरे वय २८ रा. कंडारी, अशओक सम्राट नगर, ता. भुसावळ, ४) हितेंद्र उर्फ किट्ट राजु बोदाला वय २४ रा. झेड.टी.एस. भुसावळ याचा त्याचे राहते घरी शोध घेता ते मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस करता गुन्ह्याची कबुली देवुन गुन्ह्यातील मोबाईल फोन ७०००/- रुपये किमतीचा ओपो A३१ या कंपनिचा स्काय ब्लु रंगाचा आ.क्र. ०४ याचे कडेस मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपीताची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपासकामी आरोपीताना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात रिपोर्टाने पुढील कारवाई कामी दिलेले आहे.


