जळगाव : महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताहाच्या अनुषंगाने आज जळगाव शहरातील मंगलम सभागृहात नागरिकांच्या चोरीस गेलेल्या मुद्देमाल, मोबाईल, दाग- दागिणे व पोलिसांनी हस्तगत केलेले मुद्देमाल जवळपास 10 लाख रुपये कॅश, 5 तोळे सोने 60 मोबाईल फोन्स आज रोजी उपस्थित नागरिकांच्या हाती सोपविण्यात आल्या तर आणखी काही इतर मुद्देमाल कोर्टाच्या परवानगीने पोलीस स्टेशन परवानगी घेऊन परत करण्यात कारवाई सुरू आहे. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आदी सह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थित होते. तर जनतेचे व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे पोलिसांचे काम आहे. जर कोणाकडे चोरी झाली असल्यास काही अडचण असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल करावी त्यावर नक्कीच तात्काळ कारवाई केली जाईल – अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी


