जळगाव प्रतिनिधी रविंद्र कोळी….मा. राज साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून व मा. विनय भोईटे साहेब (निरीक्षक जळगाव तथा राज्य उपाध्यक्ष मनसे) यांच्या मार्गदर्शनानुसार,जिल्हाध्यक्ष अँड जमील देशपांडे,मनसैनिक महेंद्र सपकाळे यांच्या उपस्थितीत नववर्ष निमीत्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जळगाव शहरातील तरुणांनी पक्षप्रवेश केला.
चेतन पवार,विकास गाडे, भुषण पाटिल, संदिप सोनवणे,सत्यम पवार,राहुल कोळी, बंटी चव्हाण, शुभम काळे प्रशांत गाडे,अक्षय पवार,भैय्या सपकाळे , दिपक सपकाळे, विशाल दळवी,सागर बाविस्कर, अक्षय चव्हाण, धीरज काळे या तरुणांनी आज नववर्षानिमित्त पक्षप्रवेश करून मा. राज साहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा संकल्प केला आहे.
पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाबाबत निष्ठा, पक्षातील शिस्त जाणून घेऊन आजपासून निस्वार्थ मनाने पक्षाचे काम करू असं संकल्प केला आहे. याप्रसंगी मा. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मा. विनय भोइटे साहेब यांच्या मार्गदर्शनाने चेतन पवार यांची जळगाव च्या उपशहर अध्यक्ष
या पदावर नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष मा. अँड. जमील देशपांडे यांच्या हस्ते चेतन पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


