जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये नववर्षानिमित्त ‘येल्लो डे’ साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालून पिवळ्या रंगाचा समावेश असलेले विविध खेळ खेळले तसेच विविध गीतांवर जल्लोष केला.
कार्यक्रमांमध्ये शाळेच्या आवारात सूर्याच्या चेहऱ्याची व पिवळ्या फुलांच्या पाकळीचा वापर करून भव्य रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाचा खाऊ डब्यात आणला होता. यामध्ये ढोकळे, केळी, कुरकुरे, पोंगे, खिचडी आदींचा समावेश होता. विद्यालयाच्या आवारामध्ये सूर्यफुलाच्या आकाराचा सेल्फी पॉइंटही बनवला होता. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतली.
काही विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाविषयी माहिती सांगितली. यावेळी झेंडूच्या फुलांचा छोटा हार देखील अनेक विद्यार्थ्यांनी बनवला. यावेळी पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या वस्तू वापरून विविध खेळ विद्यार्थ्यांनी खेळले. नववर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी एका कागदावर संकल्प लिहून तो बंद पेटीत टाकला.
यावेळी शाळेच्या उपशिक्षिका सेजल बोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यांनी केले. यावेळी उपक्रम प्रमुख मुकेश नाईक, मुख्याध्यापिका शितल कोळी स्वाती नाईक, आम्रपाली शिरसाठ, पूजा आस्कर ,सोनाली चौधरी, मेघा सोनवणे, शितल योगिता सोनवणे, निलेश पवार सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


