अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सहावी आणि सातवीतील पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद् भागवतगीतेचा संदर्भ,
तर अकरावी-बारावीच्या संस्कृत पुस्तकात भगवद्गीतेतील श्लोकांचा समावेश करण्यात येणार – असे शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले
*पहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री*
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्रालयाने 2020 मध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनमध्ये आंतर शाखीय आणि आंतर विद्याशाखांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली विभागाची स्थापना केली
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, भारताचे पारंपरिक ज्ञान, जे शाश्वत व सर्वांच्या कल्याणासाठी आहे – तसेच शालेय जीवनापासून मुलांना भगवद्गीतेची ओळख व माहिती मिळावी, म्हणून शाळेतील पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद् भगवद्गीतेचा समावेश करण्यात येणार असे – असेही शिक्षणमंत्री यांनी सांगितले.


