पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेळीपालन योजना सुरु केली आहे. स्वत:चा शेळीपालनाचा व्यवसाय करण्याचा विचार असेल, तर अशा लोकांना राज्य सरकारकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
*शेळीपालन योजनेसाठी अटी*
▪️ शेळी पालन सुरु करण्यासाठी अर्जदाराकडे किमान 9000 चौरस मीटर जमीन असणे आवश्यक, ज्यात 100 शेळ्या व 5 बोकड ठेवता येतील. तसेच चारा पिकवता येईल
▪️ योजनेसाठी अर्ज करताना भाडे पावती / एलपीसी / भाडेपट्टा करार / 9,000 चौरस मीटर जागेचा दृश्य नकाशा सादर करावा लागेल.
▪️ स्वतःहून दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. एक लाखाचे कर्ज घेतल्यास, एक लाख रुपयांचा धनादेश किंवा पासबुक किंवा एफडी किंवा इतर कोणताही दस्ताऐवज द्यावा लागेल
*अर्जदारासाठी पात्रता*
योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल. पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. शेळीपालनाचा अनुभव असावा. स्वतःची जमीन असणे आवश्यक
अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक.
👉 या mahamesh.co.in/ वेबसाईटवर आपल्याला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे


