पारोळा तालुक्यातील एका गावातील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. एकाने घरात घुसून २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी एका विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिला दि १० रोजी रात्रीच्या सुमारास महिलेसह दोन्ही मुलांनी जेवण करून झोपून गेले त्यानंतर त्या रूममधील लाईट सुरूच होती. रात्री ११ वाजेच्या सुमारास महिलेला घरात कुणी तरी शिरले असे आढळून आले असता यावेळेस संशयित आरोपी सुरेश भिकन पवार यांनी महिलेशी जबरदस्ती केली असता. महिलेने आरडा ओरड केली असता संशयित आरोपी हा तेथून पळून गेला त्यानंतर महिलेने घडलेली घटना आपल्या नातेवाईकाना सांगून याबाबत संशयित आरोपीच्या घरी सकाळी गेले असता त्यठिकाणी तो आढळून न आल्याने त्याच्या विरोधात दि १३ रोजी पारोळा पोलिसात अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी निलेश गायकवाड हे करीत आहेत.

