अमळनेर: (प्रतिनिधी- पंकज पाटील) क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव द्वारा आयोजित केलेल्या विविध क्रीडास्पर्धांमध्ये *मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यूव स्कूल, अमळनेर येथील* विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत आपल्या यशाची परंपरा अबाधित राखली आहे. *कराटे, तायक्वांदो, कुस्ती, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी या मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये* तालुकास्तरावर झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंदडा ग्लोबलच्या विद्यार्थ्यांनी *जिल्हास्तरावर आपले स्थान निश्चित केले.*
त्याचबरोबर *कॅरम, रायफल शूटिंग, सिकाई मार्शल आर्ट, बुद्धिबळ आणि रग्बी या क्रीडा स्पर्धामध्ये* जिल्हास्तरावर झालेल्या स्पर्धेत मुंदडा ग्लोबलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत *विभागीय स्तरासाठी आपले स्थान निश्चित केले.*
सदर क्रीडास्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक विनोद पाटील, पंकजराव पाटील, हेमंत जाधव, यज्ञनेश जगताप, रोनक शेख व रमीझ शेख यांचे मार्गदर्शन लाभले
संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन सौ छायाभाभी मुंदडा, सहसचिव श्री योगेश मुंदडा, सचिव श्री अमेय मुंदडा, ऍडमिनिस्ट्रेटर सौ दीपिका अमेय मुंदडा, श्री नरेंद्र मुंदडा, श्री राकेश मुंदडा, श्री पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य श्री लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ विद्या लक्ष्मण, प्री प्रायमरी को ऑडीनेटर सौ योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या.