अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील या गावातील ही अजब शाळा आहे. अन् यात गजब प्रकार पहायला मिळतात. अजून बरेच काही आहे. याची उकल मात्र कोणी नाही करू शकत. कारण जो बोलणार तोच भांडी घासणार अशी स्थिती या गावात आहे. कारण चावयस तर बठठ््गाव पन शाळांमा डूकाले कोणी जास नाही तर राजकीय नेत्यांनी मुख्याध्यापकाला हाताशी घेत मुख्याध्यापकाच्या तोंडाला कुलूप ठोकले आहे. अन् कुलूप ठोकलेल्या मुख्याध्यापकाची लगाम तीसऱ्याच्या हाती आहे. शिक्षकांना कशाप्रकारे हाताळाले जात आहे. हा मात्र स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. आणि याचे पडसाद मात्र विद्यार्थ्यांवर उमटायला लागेल आहेत. जो शिक्षक वर्गात शिकवणार तोच शिकवणार ज्याला गरज नाही. तो बाहेर विरंगुळा करत बसणार अशी शाळेची स्थिती आहे. यांना शिक्षकांना कोणाचाच धाक उरला नाही. मुख्याध्यापकाने वेठीस धरलेल्या शिक्षकांना शाळेत येण्या जाण्यासाठी वेळेचे बंधन नसते. अन वर्गावर शिकवण्यासाठी मनमर्जी प्रमाणे वागायला मुबा असते.
मात्र मुख्याध्यापकांच्या विरुद्ध चालणाऱ्या शिक्षकाला मात्र वेळेवर शाळेत पोहोचणे बंधनकारक असते. पण मुख्याध्यापक कधी येतात जातात त्यांचा वेळ विचारणार कोण?मुख्याध्यापकासाठी शाळा आणि घर एक समानच झाले आहे. वाटेल तेव्हा यायचे आणि वाटेल तेव्हा जायचे कारण मुख्याध्यापकांवर कोणाचाही बंधन नाही. शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची उत्सुंगतेची आस दिसत नाही. या शाळेतील शिक्षणाचा बट्ट्याबोळ गावातील कट्ट्यांवर चांगलाच चर्चेत रंगला आहे. पण माझ्या गरीब- माय बाप रात्रंदिवस कष्ट करत हाडाचे पाणी करत आहे. अन् मुलाबाळांना मोठ्या आशेनं पाठवतय तर त्याचं लेकरू घडणार या शाळेत आणि त्याचं जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार का? असा प्रश्न मात्र उभा आहे.
या सर्व गोष्टींना कंटाळून काही पालकांनी आपले मुलं दुसऱ्या नामांकित शाळेत घातली आहेत. त्यांची मुलं बाहेर चांगलं शिकतील पण मग गरिबांच्या मुलांचे काय? त्यांना कोणी वाली आहे का नाही? गुणवत्ता पूर्ण काम व शिक्षण देणे हेच शाळेच्या कर्तव्य नाही का? (संपादक- रजनीकांत पाटील – माझी शाळा भाग ६ उद्या)