मानवाचा सर्वागीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घर हे शिक्षणाचे पहिले स्थान असते. प्रत्येक मुलाच्या जीवनात आई – वडील हेच त्याचे सर्वात प्रथम शिक्षक असतात. ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार देऊन त्यांना घडवतात. त्यानंतर ते आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिक्षक त्यांना एक चांगल्या प्रकारचे वळण देतात आणि देशाचा एक चांगला नागरिक घडविण्याचे कार्य करतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया हा शाळेतच रचला जातो. शाळेत प्राप्त झालेले शिक्षण, संस्कार आणि मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश हे अवलंबून असते. त्याच बरोबर शाळेमध्ये मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते.

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण हे खूप महत्वाचे असते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण असे शिक्षण प्रणालीचे तीन भाग आहेत. शिक्षणाच्या सर्व स्तरांना विशेष महत्त्व आणि स्थान आहे. प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा प्रदान करते, जे संपूर्ण जीवनभर मदत करते. माध्यमिक शिक्षण हे भविष्यात आयुष्याचा मार्ग तयार करते.
अमळनेर तालुक्यातील एका ग्रामीण भागातील आहे. ही शाळा पण आजच्या घडीला या शाळेत शिक्षकाची शिकवण्याची मानसिक स्थिती पाहिजे तशी नाही. वर्गात जाऊन फक्त विद्यार्थ्यांन पुढे पठण करत पोर्षण पूर्ण करण्याच्या मार्गावर दिवसरात्र कष्ट करणारा शेतकरी बाप मोठ्या आशेने आपल्या लेकरांना शाळेत पाठवत आहे. काहीतरी अपेक्षा घेऊन जगत आहे. पण मास्तर शाळेत येऊन आरामान पंख्याची हवा खात राजकीय पुढाऱ्यांनी हाजी- हाजी अन् करत विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची भाजी करत आहे. राहू – केतू ला घेतले हाती. मी शाळेचा शिक्षक संस्थेत निवडलेले पदाधिकारी माझे नातेवाईक मी कोणाला भिऊ …. जो बाप आपल्या लेकरांना शाळेत पाठवतो त्या लेकरांना वाचता सुद्धा येत नाही.हा विचार कधी त्या शिक्षकांनी केली का? त्या शिक्षकांची मुलं शहरातल्या खाजगी चांगल्या प्रकारच्या इंग्लिश मीडियमला स्कूलला हजारो रुपये डोनेशन भरून शिकतात. त्यांच्यासाठी हजारो रुपये ते खर्च करून त्यांना बाहेर क्लास लावतात. मग या शाळेतला विद्यार्थी कसा घडवणार मग आता नेमका शिक्षक शिकवत नाही की विद्यार्थी आचरणात आणत नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे……भाग -३ पहा उद्या (संपादक रजनीकांत पाटील)

