नाशिक: nashik जिल्ह्यात ल्या सुरगाणा (surgana)तालुक्यातील पिंपळसोंड( pimpalsond) उंबरपाडा तातापाणी गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकासोबत दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

सुरत येथील सहलीसाठी आलेल्या students विद्यार्थ्याचा साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 1500 फुट उंचावरून हा तरुण खाली पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तक्षिल संजाभाई प्रजापती (Takshil Sanjabhai Prajapti) (वय १८) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी होता. त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता.
दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईट धबधब्यावर पोहोचले. तिथे अंघोळ करत असतांना खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरला आणि तो 1500 फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळें तो जागीच मृत् पावला या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच सदर ठिकाणी पोलीस आणि वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
त्यांनतर सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला.
त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

