नाशिक: जिल्ह्यातून पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलात (SSB) रुजू झालेल्या महिला जवानाचे निधन झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. निफाड तालुक्यातील देवगाव येथील गायत्री विठ्ठल जाधव या सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होत्या. ट्रेनिंगच्या दरम्यान खड्ड्यात पडून अपघात झाला होता.

विशेष म्हणजे नाशिक nashik जिल्ह्यातून सीमा सुरक्षा दलात भरती होणारी पहिली महिला जवान गायत्री जाधव (Gayatri Jadhav) होती. अत्यंत गरिबीची परिस्थितीत गायत्रीने हातमजुरी, रोजंदारी काम करत देवगाव येथील डी आर भोसले महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर लासलगाव नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर लासलगाव येथीलच एका खाजगी अकॅडमी ट्रेनिंग घेत. त्यानंतर 2021 मधील स्टाफ सिलेक्शनच्या सीमा सुरक्षा बलाच्या परीक्षेत ती पास झाली. v यशाचे शिखर गाठले त्यानंतर राजस्थान येथील अलवर येथे ट्रेनिंगसाठी तिची निवडही झाली. राजस्थानमध्ये ट्रेनिंग पूर्णत्वास जात असताना खड्ड्यात पडून तिचा अपघात झाला. यावेळी तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान शस्त्रक्रियेनंतर गायत्री पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने जयपूर येथील एसएम हॉस्पिटलमध्ये पुन्हा मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर बिहार राज्यातील अरिहार जिल्ह्यातील एसएसबी बथनाहा येथील नेपाळ सीमेवर नियुक्ती झाली. मात्र काहीही दिवसानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन घरी आली. त्यानंतर नाशिक येथील दोन खाजगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर जून महिन्यात मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या हॉस्पिटलमध्ये तीन महिने उपचार घेतल्यानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी एम्स दिल्ली येथे संदर्भ देण्यात आला. मात्र तिथे जाण्यापूर्वी तिची तब्येत खालावली. व त्यातच तिचा मृत्यू झाला.

