एरंडोल: बाथरूम मध्ये बसविलेला गिझर चा पाईप लिक होऊन गॅस गळती झाल्याने आंघोळी साठी बाथरूम मध्ये गेलेल्या १६ वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू

सविस्तर माहिती अशी की एरंडोल येथील रेणुका नगर भागातील यश वासुदेव पाटील वय १६ वर्ष हा बालक सकाळच्या दहा वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला असता बऱ्याच वेळ होऊन देखील बाहेर न आल्याने याबाबत त्याला घरच्यांनी आवाज दिला असता तिकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा ठोकला तसेच काही वेळाने दरवाजा तोडला असता बाथरूम मध्ये यश हा बसलेल्या अवस्थेत आढळला गॅस गिझरचा पाईप लीक होईन त्यातून गॅस बाहेर आल्याने त्याच्या बाथरूम मध्येच गुदमरू मृत्यू झाला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

