अमळनेर शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे झोका खेळताना एका १४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेची संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील मुंदडा नगर भागात राहणाऱ्या १४ वर्षीय वेदांत संदीप पाटील हा इयत्ता नववीत शिकत होता. दिनांक २० रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास वरच्या खोलीत गेला असता झोका खेळताना तोल जावून फास गळ्यात अडकला. आईने आवाज दिला मात्र प्रतिसाद न दिल्याने वर जावून पाहिले असता त्याला फास लागल्याचे दिसून आल्याने त्यास ताबडतोब खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे आईवडील दोन्ही शिक्षक शिक्षिका असून त्याच्या आई जयश्री पाटील यांनी नुकताच मराठी कोण होईल करोडपती या कार्यक्रमात भाग घेतला होता. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यांत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

