उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील तापमानाचा पारा घसरला आहे – त्यामुळे पुढील चार दिवसांत थंडीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे , असे हवामान विभागाने म्हटले आहे

कुठं वाढणार थंडी ?
राज्यातील जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, नागपूर आणि सांगली या जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे
तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीचा अंदाज असल्याने महाराष्ट्रातही त्याचा परिणाम दिसू शकतो.

