अनेक नागरीकांनी रेशन दुकानांतून धान्य घेताना वजनात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सरकारकडे केल्या आहेत

त्यामुळे आता ही फसवणूक बंद करण्यासाठी रेशन दुकानात ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस अनिवार्य केले आहे – असे केंद्र सरकारने म्हटले आहे
आणखी काय सांगितले केंद्र सरकारने ?
केंद्र सरकारने रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरण इलेक्ट्रॉनिक स्केलशी जोडण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा नियम जारी केले आहेत.
यामुळे रेशन दुकानदारांना इलेक्ट्रॉनिक स्केल ठेवणे अनिवार्य असणार आहे. ज्यामुळे नागरिकांसोबत वजनात होणारी छेडछाड धान्य घेताना थांबवली जाऊ शकते
तसेच या डिव्हाईसमुळे रेशन घेताना वजनात होणारी फसवणूक लक्षात येण्यास मदत होणार – याचबरोबर जर काही रेशन दुकानदारांनी फसवणूक केली तर ही बाब लोकांच्या लक्षात येणार आहे – असे केंद्र सरकारने म्हटले आहे

