आपण एखाद्या महामार्गावरून १ किलोमीटर किंवा ५० किलोमीटरचा प्रवास करतो तेव्हा सारखाच टोल द्यावा लागतो. त्यामुळे कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांना अनेकदा असे वाटते की आपली फसवणूक केली जात आहे –
यामुळे हि फसवणूक टाळण्यासाठी टोल नियमामध्ये बदल करण्यात येणार – असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले
आणखी काय म्हणाले नितीन गडकरी
महामार्गावरील टोल प्लाझा काढून , त्याऐवजी कॅमेरे बसवण्यात येणार – त्यामुळे महामार्गावर गाडी चालवतांना, संबंधित गाडीशी जोडलेल्या बँक अकाउंटमधून थेट टोल टॅक्सचे पैसे कापले जातील.
या सुविधेमुळे आपण जेवढ्या किलोमीटरचा प्रवास कराल, तेवढ्याच किलोमीटरचा टोल टॅक्स भरवा लागणार, तसेच टोल टॅक्स न भरणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येईल, असेही नितीन गडकरी म्हणाले