अमळनेर: तालुक्यातील बोरी नदी पात्रातून वाळू वाहतूक काय थांबण्याचे नावच घेईना झोपलेल्या प्रशासनाने जागे होऊन कठोर पावले उचलायला हवी

बोरी नदीपात्रातून रात्रीच्या सुमारे वाळू वाहतूक करत नदीपात्रातून वाळू बाहेर काढत. त्याच वाळूची कान्या कोपरात ढिगारे मारले जातात. आणि ती डिगारे विकली जातात छोट्या तिन चाकी ॲपे वाहनांच्या साह्याने सुसाट पणे गल्लीबोळातून ही वाहने पळवतात वाळू ही थेट बांधकामाच्या जागी पर्यंत पोहोचत असते. रात्रीच काय दिवसादेखील असे अनेक प्रकार शहरात पाहायला मिळत आहे. प्रशासनाचा या गोष्टीकडे पूर्णपणे काना डोळा असल्याची दिसत आहे. या वाळू वाहतुकीदारांना कोणाचाही भय राहिलेला नाही. हिवाळ्याला सुरुवात झाली असून थंडीच्या
गुलाबी हवेत प्रशासन सुस्त झाले आहे. आणि इकडे वाळू वाहतूकदारांची वाळू उपसा मस्त सूरू आहे.

