गॅस सिलेंडरवरील फसवणूक टाळण्यासाठी सर्व घरगुती गॅस सिलिंडरवर QR कोड स्थापित केला जाणार ,असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

पहा काय सांगितले हरदीप सिंग पुरी?
या QR कोडमुळे कोणत्या सिलिंडरमध्ये किती वेळा रिफिलिंग केली तसेच सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर परत येण्यासाठी किती दिवस लागतात या विषयीची माहिती मिळेल.
याचबरोबर जर कोणी घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक सिलेंडर म्हणून वापरा करीता दिले असेल, तर ते कोणत्या डीलरकडून वितरित केले गेले याची देखील माहिती मिळेल.

