जळगाव : भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता संघर्ष करणाऱ्या प्रमुख महापुरूषांमधे जवाहरलाल नेहरू हे एक ज्यांना आपण पंडित जवाहरलाल नेहरू व नेहरू चाचा या नावांनी देखील ओळखतो. आपल्या भाषणांनी त्यांनी लोकांची मने जिंकली होती. या मुळेच ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले या महान पुरूषाची आज जयंती निमित्त केले जळगाव शहरात नेहरू यांच्या स्मारकाला मल्यार्णप करण्यात आले.
यावेळ शहराचे महापौर जयश्रीताई महाजन, आयुक्त विद्या गायकवाड,
शाखा अभियंता चंद्रकांत सोनगिरी,
कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर, शाखा अभियंता मनीषा अमृतकर व मनपाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.