अमळनेर : पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून अमळनेर तालुक्यातील सहा शाळांना संगणक वाटप करण्यात आले.
शाळा अद्ययावत करण्यासाठी तसेच शाळेचा कार्यभार ऑनलाईन व संगणकीकरण करण्यासाठी आमदार डॉ तांबे यांनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा , अंतुर्ली रंजाणे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा , नॅशनल उर्दू हायस्कूल , शिवाजी हायस्कूल तांबेपुरा , भगिनी मंडळ आदर्श शाळा , श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय भरवस या शाळांना सानेगुरुजी पतपेढीचे सचिव तुषार बोरसे यांच्या हस्ते संगणक वितरण करण्यात आले. यावेळी मोहन सुपेकर , मुख्याध्यापक संदीप पवार ,अशपाक शेख ,विजय पाटील , रुपाली पवार ,शुभांगी कुलकर्णी , दिलीप सुर्यवनशी , युनूस शेख मुशीर हजर होते.


