उत्तर प्रदेशच्या शामली(shamil) जिल्ह्यातील कॅरोनो येथील 3.2 फूट उंचीच्या अझीम मन्सुरीच्या azim mansuri विवाहाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. त्याचा विवाह हापूडची रहिवाशी 3 फूट उंचीच्या बुशरासमवेत busharasamvet झाला.
अझीमने आपल्या लग्नासाठी मुलगी मिळण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ yogi adityanath आणि भाईजान सलमान खानकडे salman khan मागणी केली होती.
काही दिवसांपूर्वी अजीम आपले लग्न व्हावे, यासाठी एक अर्ज घेऊनच पोलिस ठाण्यात पोहोचला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजीमला लग्नाची स्थळे येऊ लागली. अझीम वरात आणण्यासाठी जात असताना त्याच्या वडिलांनी त्याला उचलले. आज मी माझ्या बायकोला आणण्यासाठी जात आहे, देवाने माझी मागणी पूर्ण केली, असे सांगत अझीम शेरवानी घालून मोटारीत बसला.अझीम मोटारीत बसल्यानंतर मोटारीसमोर त्याचे नातेवाईक डान्स करत होते.
लग्नाची त्याची इच्छा पूर्ण झाली असल्याचे अझीमच्या वडिलांनी सांगितले. अझीमची उंची कमी असल्याने लग्नाची स्थळे येत नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अनेक स्थळे आली; मात्र त्याला मझीदपूरामध्ये राहणारी बुशरा आवडली. बुशराने बी-कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले